९ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या घटक ब चे नोंदणीकृत शेतकरी (महाऊर्जा) आणि महावितरण कडे अर्ज केलेले (Paid Pending) शेतकरी यांना दिलासा देणारा निर्णय ५ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला.
केंद्र शासनाने महावितरण कंपनीस २,००,००० पारेषण विरहित कृषीपंप राज्यातील मागणी केलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडणीच्या पूर्ततेसाठी (Paid Pending) आणि योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांतून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून अस्थापित करण्यात मान्यता देण्यात येत आहे.
महाऊर्जा पीएम-कुसुम घटक-ब साठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती लवकरच महावितरण कडे प्राप्त होईल आणि त्यानुसार अर्जदारांच्या ज्येष्ठतेनुसर कृषी पंप वाटप करण्यासाठी निवड करण्यात येईल.
सौर कृषी पंपाचा लाभ मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्याचा विरुद्ध महाऊर्जा/महावितरण कंपनी यांच्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल.